वाई: साताऱ्यातील महाबळेश्वर लगतच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला वाळणे ( ता महाबळेश्वर)गावात ही दुर्दैवी घटना घडली. १२ ते १३ वयोगटातील चार मुली आज रविवारी दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या . पोहत असताना त्यातील तिघी बुडाल्या.यावेळी  मुलींनी व लगतच्या लोकांनी आरडाओरडा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी गावकरी मंडळी जमा झाली. त्यांनी सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . यावेळी एकीचा जागी मृत्यू झाला. तर तिघीना उपचारासाठी  तापोळा येथे  आणण्यात  आले.तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना महाबळेश्वर येथे पाठविण्यात आले . उपचार सुरू असताना एकीचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघींना वाचविण्यात यश आले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two girls died after drowning in shivsagar reservoir in satara amy