सांगली : रिळे (ता. शिराळा) येथे जंगली गव्यांनी दोनशे एकर शेती क्षेत्रातील पिकांचे नुकसान केले आहे. त्याचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, असे प्रतिपादन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिळे (ता. शिराळा) येथे जंगली गव्यांनी २०० एकरमधील शेती पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, शाळू, मका, पावटा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विश्वास सहकारी साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक व ‘यशवंत ग्लुकोज’चे अध्यक्ष रणधिर नाईक यांनी या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. वन अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून झालेल्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करावेत. त्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत सत्वर अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना केल्या.

या वेळी सरपंच बाजीराव सपकाळ, माजी सरपंच एम. एस. पाटील, उपसरपंच आनंदा जाधव, दीपक पाटील, सुशांत आढाव, आनंदा जाधव, मिलिंद खामकर, नामदेव पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.