नांदेड : लोहा तालुक्यातील येळी महाटी पुलावरुन एक क्रुझर जीप गोदावरी नदीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे व उद्धव आनंदराव खानसोळे, अशी मृतांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुदखेड तालुक्यातील शिखांची वाडी येथील उद्धव खानसोळे क्रुझर गाडीचे भाडे सोडून लोहा तालुक्यातील येळी येथील त्यांचा मित्र थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे यांना भेटण्यासाठी दुपारी आला होता. दरम्यान दोघेही तातडीने मुदखेडच्या दिशेने जात असताना येळी गावच्या बाजूने असलेल्या गोदावरी नदी पात्राच्या ३० ते ३५ फुट खोल पाण्यात गाडीसह पडून बुडाले. घटनास्थळी  गावकरी जमा झाले. त्यापैकी गावातील काही नागरीकांनी नांदेड येथील अग्निशमन दलाला व पोलिसांना माहिती दिली. नांदेड येथील अग्निशमन दलाचे अधिकारी दासरे व नीलेश कांबळे यांच्यासह सर्व कर्मचारी दाखल झाले. उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार, बीट जमादार नीळकंठ श्रीमंगले, पवार यांचेही पथक पोहोचले. गावकऱ्यांनी बोटीच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह गोदावरी पात्रातून बाहेर काढले. 

मृत थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे व उद्धव आनंदराव खानसोळे यांचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहेत. घटनास्थळाला मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत सप्रे बाबासाहेब कांबळे सहायक पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed in cruiser crash in godavari nanded amy