सातारा: सातारा-लोणंद रस्त्यावर अंबवडे सं. वाघोली (ता. कोरेगाव) गावानजीक सोमवारी दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे चालक ठार झाले. यातील एका ट्रकने अपघातानंतर पेट घेतल्याने त्याच्या चालकाचा ट्रकमध्ये अडकून मृत्यू झाला. याशिवाय अन्य दोघे यामध्ये जखमी झाले आहेत. अल्ताफ मन्सुरी, (वय-२०, रा. भगोरा, ता. जिरापूर, जि. राजगड, मध्यप्रदेश) आणि महेश दयानंद घुगे (वय ३७, हल्ली रा. गोकुळ शिरगाव, कोल्हापूर) असे मृत चालकांचे नाव आहे.

लोणंद बाजूकडून कडप्पा फरशी भरलेला ट्रक (क्रमांक आरजे १७ जीबी ६५६१) साताऱ्याच्या दिशेने चालला होता. तर आयशर (क्रमांक एमएचजी -७७७५ ) हा मालट्रक साताऱ्याहून लोणंदच्या दिशेने निघाला होता. आंबवडे चौक ते पिंपोडे खुर्द गावांच्या दरम्यान या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. त्यामध्ये कडप्पा भरलेल्या ट्रकचा चालक अल्ताफ मन्सुरी हा जखमी अवस्थेत अडकला होता. धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या केबिनने पेट घेतला. त्या स्थितीत ट्रकचा जखमी झालेला क्लिनर मांगीलाल रामप्रसाद भोल याने जखमी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आहे.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Former BJP MP from Dindori Constituency Harishchandra Chavan passed away
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी

हेही वाचा – अजित पवार आघाडीत असते, तर भविष्यात मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांची खोचक टीका

हेही वाचा – पलूसमध्ये महिलेला मारहाण करून लूटमार, महिला जखमी

मांगीलालच्या डोळ्यासमोर चालकाचा गाडीच्या आगीत जळून मृत्यू झाला. अन्य आयशर ट्रकच्याही केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला. यामध्ये त्याचा चालक महेश दयानंद घुगे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला वाठार स्टेशन पोलिसांनी तातडीने उपचारांसाठी शासकीय रुग्णालय सातारा येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.