मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा खोदारे (वय ४७ रा.) व वनमजूर मंगेश चांगू वाजंत्री (वय ३५ रा.) अशी या दोघांची नावे आहेत. दोघांच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहता बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे फणसाड अभयारण्यावर बिबटय़ाची दहशत पसरली आहे. कृष्णा खोदारे जंगलात बल चारण्यासाठी गेले होते. ते दिवसभरात परत न आल्याने स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी कृष्णा खोदारे यांचा मृतदेह गावकऱ्यांना जंगलातच सापडला.
फणसाड अभयारण्याचे वनरक्षक हरीशचंद्र लक्ष्मण नाईक व वनमजूर मंगेश चांगू वाजंत्री अभयारण्यातील पाणवठे स्वच्छ करीत होते. त्यांच्या सोबत असलेले वरिष्ठ वनपाल नांदगाव आय. आर. िवचू यांना वेळास्ते गावात सोडण्यासाठी वनमजूर मंगेश वाजंत्री दुपारी गेला होता. सायंकाळ झाली तरी तो परत न आल्याने त्याच्या शोधासाठी वनरक्षक हरिश्चंद्र नाईक व काही वनमजूर गेले असता पाणवठय़ाजवळ मंगेशचा मृतदेह आढळला. दोघांच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहता बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा