परतूर बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गंधक (सल्फर) भट्टीच्या स्फोटात दोन कर्मचारी जागीच ठार झाले. तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. कर्मचारी आबासाहेब शंकर पारखे (वय ४४, रा. शिरसगाव ता. परतुर) पर्यवेक्षक अशोक तेजराव देशमुख (रा. राहुरी ता. सिंदखेडराजा) हे दोघे जागीच ठार झाले तर नवनाथ पांढरपोटे व कदीर पटेल (रा. वरफळ) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर परतुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर मृत दोन कर्मचाऱ्यांचे शवविच्छेदन शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर नवल यांनी सांगितले.
जालना : बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन जागीच ठार तर दोन जखमी
परतूर बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गंधक (सल्फर) भट्टीच्या स्फोटात दोन कर्मचारी जागीच ठार झाले
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-12-2024 at 22:27 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed on the spot two injured after explosion at bageshwari sugar factory zws