सावंतवाडी : तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली़. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळय़ा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत़. आकाश भास्करराव देशमुख (३०, रा. शास्त्रीनगर, अकोला), डॉ. स्वप्निल मारुती पिसे (४१, आळेफाटा, पुणे) अशी मृतांची नावे आहेत़ रश्मी निशेल कासूल (४५, रा. ऐरोली, नवी मुंबई), यांच्यावर रेडकर हॉस्पिटल येथे, तर संतोष यशवंतराव (३८, बोरिवली, मुंबई) यांच्यावर डॉ. अविनाश झांटय़े हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त मृणाल मनीष यशवंतराव (८), ग्रंथ मनीष यशवंतराव (दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतराव (साडेचार वर्षे, सर्वजण रा. बोरिवली, मुंबई), वैभव रामचंद्र सावंत (४०, रा. वायरी, तारकर्ली) आणि उदय भावे (४० ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम गजानन कोरगावकर, शुभांगी गजानन कोरगावकर, शैलेश प्रदीप परब, अश्विनी शैलेश परब, मुग्धा मनीष यशवंतराव, मनीष यशवंतराव, आयुक्ती यशवंतराव, सुशांत अण्णासाहेब धुमाळे, गीतांजली धुमाळे, प्रियन संदीप राडे आणि सुप्रिया मारुती पिसे यांना प्राथमिक उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा