संगमेश्वर : दोन बछडे सापडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुर्वेवाडी येथे पाणी साठवण करण्यासाठी तयार केलेल्या एका हौदात बिबट्याचे उघडकीस आली. याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर तीन तासांच्या प्रयत्नानंतर बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात घेण्यात आले. मात्र या घटनेमुळे येथील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवरूख पांगरी मार्गावरील तुळसणी सुर्वेवाडी येथे शरदचंद्र गीते यांची आंबा, काजूची बाग आहे. या येथील झाडांना पाणी देण्यासाठी हौद बांधण्यात आला आहे. सध्या या हौदामध्ये पाणी नाही. बागेत काम करणाऱ्या कामगारांना हौदातून आवाज आला. एका कामगाराला हौदामध्ये बिबट्याचे दोन बछडे दिसले. वनविभागाला माहिती मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बछड्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हौदामध्ये पिंजरा सोडला. तीन तासांच्या प्रयत्नानंतर बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. याकामी वनविभागाला ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले. पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेले हे बछडे सात ते आठ महिने वाढीचे असल्याचे वनविभागामार्फत सांगण्यात आले. मात्र या प्रकाराने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.