सोलापूर : घरगुती कारणांवरून वडिलांनी रागावल्यामुळे एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तर अन्य दुसऱ्या घटनेत एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीनेही आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपविले.
न्यू पाच्छा पेठेतील इंदिरा नगर झोपडपट्टीत सातवी वर्गात शिकणाऱ्या या मुलीने घरात कोणीही नसताना ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांनी घरगुती कारणावरून रागावल्यामुळे मन:स्ताप करून घेत तिने हे टोकाचे पाऊल उचलले. सदर बझार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
अन्य एका घटनेत विजापूर रस्त्यावरील कुलकर्णी तांडा येथे राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीने यंदा अकरावीची परीक्षा दिली होती. सोलापूर शहरात मागील पाच दिवसांमध्ये तीन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली आहे.