‘चोर’ म्हणून हिणवल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर व राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात हमरीतुमरी झाल्याचा प्रकार उस्मानाबादेत गुरुवारी सायंकाळी घडला. नेतेच एकमेकांच्या अंगावर आल्याचे पाहून दोन्ही बाजूंकडील कार्यकत्रेही आपसात भिडले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीआधीच खराखुरा ‘रणसंग्राम’ पाहावयास मिळाला!
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार व पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते. सेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार राजेिनबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार पाटील, जनता दलाचे अॅड. रेवण भोसले, आम आदमी पक्षाचे विक्रम सावळे, अपक्ष उमेदवार रोहन देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात निवडणूक प्रचार काळातील मुद्दय़ांवर चर्चा सुरू असताना तेरणा कारखान्याचा विषय समोर आला. या कारखान्यावर ४०० कोटींचे कर्ज डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केले. आपण यातील बरेच कर्ज फेडले असल्याचे राजेिनबाळकर यांनी सांगितले. या वेळी आमदार पाटील यांनी ‘चोरांच्या हाती गेल्यामुळेच कारखान्याची वाट लागली’ असे म्हणताच राजेिनबाळकर व त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. दोन्ही आमदारांमध्ये वाक्युद्ध पेटल्याचे पाहून दोन्ही बाजूंचे कार्यकत्रेही आपसात भिडले. त्यामुळे या कार्यक्रम स्थळालाच ‘रणसंग्रामाचे’ स्वरूप आले. वाढलेला गोंधळ पाहून हा कार्यक्रमच गुंडाळण्याची वेळ आयोजकांवर आली.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीतीलच दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. याचीही दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.
‘समोरासमोर या, कोण चोर ते कळेल’!
१९७८ पासून २००० पर्यंत सलग २८ वष्रे तेरणा कारखाना डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यात होता. आपणास चोर संबोधणाऱ्यांनी २८ वर्षांत ४२७ कोटींचे कर्ज केले. मागील ६ वर्षांत आपण यातील २०० कोटी कर्जाची परतफेड केली. कारखाना कर्जबाजारी करणारे की कर्जाची परतफेड करणारे चोर, असा प्रश्न राजेिनबाळकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठक घेऊन केला. जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्यासह महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती. यापुढील काळात केव्हाही खासदार डॉ. पाटील यांनी एकटय़ाने यावे. आपणही कोणाला सोबत न घेता येऊ. त्यांनी त्यांची बाजू मांडावी, आपण आपली सांगू. मात्र, झुंडशाहीने लोकांची दिशाभूल करू नये, असेही राजेिनबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, नेरूरकर यांनी महायुतीचे उमेदवार प्रा. गायकवाड उद्या (शनिवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. सकाळी ११ वाजता धारासूरमर्दनिी, ख्वाजा शम्सोद्दीन गाजी यांचा दर्गा या ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन महायुतीच्या समर्थकांसह गायकवाड जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी २ वाजता शहरातील छायादीप मंगल कार्यालय येथे बूथप्रमुख व सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तानाजी सावंत हे शिवसनिक नाहीत, त्यांचा सेनेशी संबंध नाही. त्यामुळे त्यांनी काय बोलावे, याकडे शिवसेना गांभीर्याने पाहात नाही, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा