सांगली : मिरज तालुक्यातील दोन गावांत दोन खूनाच्या घटना बुधवारी घडल्या असून एरंडोली येथे पत्नीने पतीचा चाकूने भोसकून, तर बेडग येथे मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रकार घडला. संशयित पत्नी फरार झाली असून मुलाला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेडग येथे घडलेल्या घटनेत दाजी गजानन आकळे (वय ७० रा. मालगाव रस्ता, बेडग) यांना मुलगा लक्ष्मण आकळे याने ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मालगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित लक्ष्मण याला तातडीने ताब्यात घेतले. मृत दाजी आकळे आणि संशयित मुलगा लक्ष्मण आकळे हे पिता-पुत्र असून दोघांमध्ये वाद होता. वडिलांकडे पैसे आणि शेतजमीन नावे करून दे यासाठी लक्ष्मणने तगादा लावला होता. मात्र, मृत आकळे हे पैसे देण्यास अथवा जमीन नावावर करून देण्यास राजी नव्हते. यातून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. यातूनच चिडलेल्या संशयिताने आज वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून मारले.

man attempt to kill wife by stabbing knife her in stomach
पोटात चाकू खुपसून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Crime News
Navi Mumbai Crime : प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूचे वार करत केली हत्या, धक्कादायक घटनेने पनवेल हादरलं
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Buldhana, Motala , dabhadi robbery, wife murder ,
बुलढाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले; दरोड्याचा रचला डाव, पण…
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा

हेही वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, निवेदन जारी करत डॉक्टर म्हणाले…

दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पती पत्नीमध्ये जेवण करण्यावरून झालेल्या वादात पत्नीने पतीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना एरंडोली येथील पारधी बेघर वस्तीवर घडली. या घटनेनंतर महिलेने पलायन केले आहे. पारधी वस्तीवर राहणारा सुभेदार आनंदराव काळे (वय ४५) आणि पत्नी चांदणी काळे यांच्यात जेवण करण्यावरून वाद झाला. या वादात महिलेने चाकूने पतीच्या छातीवर वार केले. यात तो जागीच ठार झाला. या दोन्ही घटनांची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून फरार झालेल्या महिलेच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader