अफगाणिस्तानला पळू पाहणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन संगणक व काही आक्षेपार्ह कागदपत्रे हैदराबाद येथील विशेष पथकाने जप्त केली. हैदराबाद, नागपूर, अमरावती, अकोला व नांदेड येथील दहशतवादविरोधी पथकांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या दोघांच्या साथीदारांचा आता शोध घेतला जात आहे.
उमरखेडचा मुशीद शाह व आखाडा बाळापूर येथील शोएब अहमद खान (मूळ रहिवासी पुसद) या दोघांना हैदराबादच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गेल्या आठवडय़ात ताब्यात घेतले. घातपाती व जिहादी कारवायांत सहभागी होण्यासाठी हे दोघे इराकमध्ये जाण्याच्या तयारीत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी परदेशात जाण्यासाठी पासपोर्टही तयार करून घेतला. हे दोघे पळून जाण्याच्या तयारीत असताना हैदराबादच्या विशेष तपास पथकाला त्यांचा संशय आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिरेकी संघटनांशी संबंध ठेवणाऱ्या काही तरुणांचा हैदराबादसह महाराष्ट्रातल्या एटीएस पथकाने शोध सुरू केला आहे.
विशेष म्हणजे या दोघांची नांदेड एटीएसनेही इत्थंभूत माहिती मिळवली होती. परंतु नांदेड एटीएसने कारवाई करण्यापूर्वीच हैदराबादच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. विशेष पथकाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. गेल्या काही दिवसांत त्यांची माहिती जमा करून त्यांची पोलीस कोठडी घेतली. सध्या हे दोघे हैदराबाद पथकाच्या पोलीस कोठडीत आहेत. मुशीद शाह व शोएब अहमद खान या दोघांना घेऊन हैदराबादचे पथक रविवारी मध्यरात्री नांदेडात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ अमरावती, अकोला येथील दहशतवादविरोधी पथकांचे अधिकारी दाखल झाले. या सर्व अधिकाऱ्यांमध्ये पहाटे संयुक्त चर्चा झाल्यानंतर सोमवारी िहगोली व उमरखेड येथील त्यांच्या कार्यालयात छापे टाकण्यात आले.
शोएबच्या िहगोलीतील कार्यालयावर नांदेड एटीएसचे प्रमुख माणिक बेद्रे यांच्या पथकाने छापा टाकून संगणक जप्त केला. अकोल्याचे पोलीस उपअधीक्षक पुनीत कुलट यांच्या पथकाने मुशीद शाहच्या घरातून संगणक व आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. अत्यंत गोपनीय स्वरूपात ही कारवाई केल्यानंतर सायंकाळी सर्व पथके नांदेड कार्यालयात दाखल झाली.
नांदेड कार्यालयात मुशीद व शोएबच्या नांदेड, िहगोली, उमरखेड, अकोला येथील साथीदारांची माहिती घेण्यात आली. हैदराबादच्या पथकाने दोघांच्या साथीदारांची माहिती महाराष्ट्र एटीएसने जमा करावी, असे सांगत सायंकाळी हैदराबादकडे प्रयाण केले. दरम्यान, एटीएस व हैदराबादच्या पथकातील अधिकाऱ्यांच्या बठकीच्या वेळी पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. शिवाय दहशतवादविरोधी पथक कार्यालयालाही चोख बंदोबस्त होता. या दोघांच्या साथीदारांचा शोध कशा पद्धतीने होतो किंवा त्यांच्याकडून आणखी काय माहिती मिळते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. नांदेड एटीएसचे पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांनी संगणक जप्त केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी आणखी तपशील सांगण्यास नकार दिला.
शोएबच्या नोकरीच्या ठिकाणी आंध्रातील एटीएसची चौकशी
वार्ताहर, हिंगोली
अफगाणिस्तानमध्ये जाताना सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर पकडलेल्या शोएब अहमद खान याची त्याने िहगोलीत नोकरी केलेल्या ठिकाणी आंध्र प्रदेश एटीएसच्या पथकाने सोमवारी चौकशी केली. काही कंत्राटदार मंडळींच्या घरी भेट देऊन माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पथकाने चर्चा केल्याचे सूत्रांकडून कळाले.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील शोएब अहमद खान याला अफगाणिस्तान येथे जाताना सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर पोलिसांनी पकडले होते. त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्य सापडल्याने शोएबला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली. आंध्र एटीएसकडून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीच्या निमित्ताने सोमवारी हे पथक िहगोलीत आले होते. शोएबने ज्या ठिकाणी नोकरी केली, त्या ठिकाणांसह त्याच्या निवासस्थानी पथकाने भेट दिली. जयस्वाल व खान या कंत्राटदारांच्या ऑनलाइन निविदा भरण्याचे काम शोएब करून देत होता. त्याची पथकाने माहिती घेतली. शोएब या कंत्राटदारांकडे किती वर्षांपासून काम करीत होता. तो नेमके काय काम करीत होता, याची माहिती दोघा कंत्राटदारांकडून घेतल्याचे सूत्रांकडून कळाले.
आंध्र एटीएसचे पथक व स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात शोएबसंबंधी काय चर्चा झाली, याची माहिती मात्र मिळू शकली नाही. शोएबने िहगोलीत केलेल्या कामाच्या चौकशीसाठी आलेले आंध्र एटीएसचे पथक सोमवारी दुपारनंतर आखाडा बाळापूरकडे रवाना झाले.

Story img Loader