खेड : मुंबई येथून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन एसटी बस कंटेनरवर धडकल्या. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे प्रवाशांनी फुल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा… मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणारे गणेश भक्त लोणेरे जवळ अडकले

हे ही वाचा… Maharashtra News Live: “भगवी टोपी घातलेल्या लाखो लोकांमध्ये आजही अजान होते”, अमोल मिटकरींनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ!

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. चाकरमान्यांची कोकणातील गावात जाण्यासाठी लगबग दिसून येत आहे. अशातच कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही बसमध्ये ८० प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघतात सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहेत. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two st bus accidents in kashedi tunnel due to container no passengers injured asj