लातूर : ‘नीट’ परीक्षेमुळे लातूरची बाजारपेठ किती विस्तारली असेल? लातूर शहरातील शिकवणी परिसरात दोन मजली ‘ब्युटी पार्लर’ आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी १२-१४ हजार मुली लातूरला येतात. मुलींची काळजी घेण्यासाठी बहुतांश वेळेस आईदेखील बरोबर येते. परिणामी मराठवाड्यातील इतर शहरांच्या मानाने लातूरमध्ये सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ फुलली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेणारे दोन्ही खासदार पराभूत

अर्थकारण वाढीसाठी वापरला जाणारा ‘लिपस्टिक इंडेक्स’ लातूरमध्ये बहरत आहे. डॉक्टर अथवा इंजिनीअर होण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही काळजी घेणारी बाजारपेठ फुलली आहे. आर्थिक सुबत्ता मोजण्याची एक फूटपट्टी म्हणून सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीचा निर्देशांक मोजण्याची पद्धत अर्थशास्त्रामध्ये आहे.

शहरातील ब्युटी पार्लरमध्ये ३०० रुपयांपासून आठ हजार रुपये एका वेळेला खर्च करणाऱ्या ग्राहक येतात, असे सौंदर्य प्रसाधन कक्ष चालविणाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी चार ते पाच तास वेळ द्यायलाही त्या तयार असतात. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर लातूर नांदेड ही दोन शहरे सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाची आहेत. तरुणांमध्ये सौंदर्याच्या प्रती जागरूकता वाढत असून आमच्या होणाऱ्या विक्रीतून याचा आम्हाला अंदाज येत असल्याचे फॅशन सेंटरचे हर्ष शहा यांनी सांगितले. जे. सलूनचे रवी जळकोटे यांनी लातूर शहरात व्यवसायाला चांगली संधी आहे, ग्राहक जागरूक आहेत व तेच नवीन संकल्पना लातुरात सुरू व्हाव्यात अशी मागणी करतात, असे सांगितले .

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two storey beauty parlour in coaching classes area of latur city zws
Show comments