प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज यांनी आमदारकीबाबत भाष्य केलं आहे. आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज लागतात, इंदुरीकर महाराज यांनी केली आहे. जळगावातील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात बोलत होते.
इंदुरीकर महाराज म्हणाले, “आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज, १००-२०० पतसंस्था, १००-१५० बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा आमदार होता येतं. पण, मंगेश चव्हाण जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत.”
हेही वाचा : “इंदुरीकरांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा…”, लिंगभेद वक्तव्याप्रकरणी अंनिसचा हल्लाबोल
“कोण कोणत्या पक्षात आहे? कळेना”
“आता कोणताही पक्ष राहिला नाही. कोण कोणत्या पक्षात काम करतो, हे कोणालाच कळेना झालं आहे. पक्ष कोणताही असुद्या आपली माणसं आपल्याला सांभाळायची आहेत,” असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं.
हेही वाचा : लावणी भुलली अभंगाला
“शेतकऱ्यांनी शेळ्या विकून सोयाबीन अन् कापसाची लागणी केली, पण…”
“शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. पेरलेलं पीक उगवणार यांची शाश्वती नाही. १५ दिवस झाले हवामान खाते पावसाची बातमी देईना. शेतकऱ्यांनी शेळ्या विकून सोयाबीन आणि कापसाच्या पिकांची लागणी केली. पण, आता पाऊसच आला नाही. आता माणूस कापसाकडं पाहतो आणि कापसाचे झाड माणसाकडं पाहते,” असेही इंदुरीकर महाराज यांनी सांगितलं.