लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : सांगोला मिरज रस्त्यावर, सांगोल्याजवळ मालवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची सामोरा समोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला. तर अन्य नऊजण जखमी झाले. फिक्कट गाडीतून डाळिंबाची वाहतूक केली जात होती. तर टेम्पोत ऊसतोड मजूर होते. सर्व मृत आणि जखमी सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील राहणारे आहेत.

बाबुराव महादेव गोडसे (वय ४२) आणि एकनाथ सोपान गडदे (वय ५३) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमी मध्ये विमल भारत कांबळे (वय ५५), रेश्मा संजय ऐवळे (वय ३०), सुजाता बापू आलदर (वय ३५), दामू राजाराम शिंगाडे (वय ६०), गोरख लिंगू सरगर, मोईनुद्दीन गुलाब मुलाणी (वय ७०) गणपत दत्तू आलदर (वय ५०), भारत विष्णू कांबळे (वय ६५) आणि हर्षद हणमंतु काटे (वय १८) यांचा समावेश आहे.

सांगोला तालुक्यातील कडलास येथील शेतकऱ्यांचा ऊस तोड करून जमेची १० के ६७५३) या टेम्पोमधून मिरज रस्त्यावर गौडवाडीकडे आपल्या गावी परत निघाले होते. तर एखतपूर येथून डाळिंब भरून एमएच ४५ एएफ ६७८५) पिकअप गाडी सांगोल्याच्या दिशेने निघाली होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. सांगोला पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

नदीत बुडून दोघांचा मृत्यू

मोहोळ तालुक्यातील बोपले येथे सीधा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलांसह दोघा परप्रांतीय तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शंकर जीवनलाल बिरनवर (वय १९) आणि सत्यम सिताराम गईगई ( १६ दोघे रा. मध्य प्रदेश) हे मोहोळ तालुक्यात मजुरी करीत होते. आंघोळीसाठी हे दोघे हीना नदीवर गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. दोघांचेही मृतदेह सापडले. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.