वाई:धोम बलकवडी (ता वाई)धरणातून दोन हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले. धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाणात वाढ होत असून धरणा मध्ये पाण्याची आवक १८०० क्युसेक्स होत आहे. धरणाची पाणी पातळी. ८०९.७२ मीटर झालेली असून निर्धारित मंजुर जलाशय पाणी पातळी शेड्युल नुसार पाणी पातळी कायम राखण्या करिता बलकवडी धरणातून(१६९० विसर्ग आणि ३३०क्युसेक वीज निर्मितीसाठी) दोन हजार वीस क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. 

हेही वाचा >>> सांगली: पावसाची संततधार सुरुच; चांदोलीत ७० टक्के पाणीसाठा

पाणी कृष्णा नदीतून धोम धरणा मध्ये सोडणे चालु आहे. तसेच बलकवडी धरणा मध्ये दरम्यान पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग कोणतीही सूचना न देता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे बलकवडी धरणा खालील मौजे बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील प्रशासकीय यंत्रणेने सर्तक राहून ग्रामस्थानां नदी पात्रात न जाणे बाबत सूचना देण्यात आलेली आहे.  बलकवडी धरणा खालील कृष्णा नदी काठा वरील गावांमधील सर्व नागरिकांनी सर्तक  रहावे, गुरे पाण्यामध्ये सोडू नये व कोणीही नदी पात्रात प्रवेश करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.धोम बलकवडी कालव्यातून खंडाळा शिरवळ साठी ५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

Story img Loader