पुणे- सातारा महामार्गावर आज सकाळी वाहनांची नेहमीप्रमाणे माेठी गर्दी हाेती. खंबाटकी घाटात आज (साेमवार) सकाळी घाट ओलांडून सातारा कडे येत असताना तीव्र उतारावर दोन ट्रक एकमेकाला धडकून रस्त्यावर पडल्याने घाट रस्त्यावरील वाहतुक कोंडी झाली होती.

हेही वाचा- मुंबई : समृद्धी महामार्गावरील फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी अधिक प्रतीक्षा, एमएसआरडीसीला कंत्राटदार मिळेना

पोलिसांना ही माहिती मिळताच भुईंज(ता वाई) सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
खंबाटकी घाटात झालेल्या अपघातात दाेन्ही ट्रक पलटी झाले आहेत. एक ट्रक रस्त्यावरच आडवा पडल्याने घाटातील वाहतुक खाेळंबली. या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले आहेत. वेळे ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे या रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली आहे.

Story img Loader