अलिबाग – महाडमध्ये कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाची संततधार आज दिवसभर सुरू होती. त्यातच महाबळेश्वर येथे कोसळणाऱ्या धुंवाधार पावसाने नद्या , ओढे ओसंडून वाहत होते. महाड तालुक्यात आजच्या मुसळधार पावसात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

वाळण खुर्द येथील  बाळाजी नारायण उतेकर हे ६५ वर्षीय वृध्द दुपारी गुरे चारण्यासाठी गेले असता ओहळात वाहून गेले त्यात त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. दुसऱ्या एका घटनेत आमशेत येथील अंकित विलास महामुणकर या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अंकित आपल्या मित्रांसोबत  शिवाजी वाळण येथील काळ नदीच्या पात्रात  पोहायला गेला असता पाण्यात बुडाला. त्याला बाहेर काढून  उपचारासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.