अलिबाग – महाडमध्ये कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाची संततधार आज दिवसभर सुरू होती. त्यातच महाबळेश्वर येथे कोसळणाऱ्या धुंवाधार पावसाने नद्या , ओढे ओसंडून वाहत होते. महाड तालुक्यात आजच्या मुसळधार पावसात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
वाळण खुर्द येथील बाळाजी नारायण उतेकर हे ६५ वर्षीय वृध्द दुपारी गुरे चारण्यासाठी गेले असता ओहळात वाहून गेले त्यात त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. दुसऱ्या एका घटनेत आमशेत येथील अंकित विलास महामुणकर या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अंकित आपल्या मित्रांसोबत शिवाजी वाळण येथील काळ नदीच्या पात्रात पोहायला गेला असता पाण्यात बुडाला. त्याला बाहेर काढून उपचारासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
First published on: 22-07-2024 at 02:21 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two victims in mahad due to heavy rain amy