गडचिरोलीत कौटुंबिक हिंसाचार आणि वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन महिलांनी आपल्याच कुटुंबातील ५ जणांचा खून केली. विशेष म्हणजे यासाठी दोघींनी इंटरनेटवर हत्येचे वेगवेगळे मार्ग शोधले आणि ‘स्लो पॉयझन’चा वापर करून एका महिन्याच्या काळात कुटुंबातील ५ जणांचा खून केला. गडचिरोलीतील महागाव येथे ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या खून प्रकरणात पोलिसांनी संघमित्रा कुंभारे (२२) आणि रोसा रामटेके (३६) या दोन महिला आरोपींना बुधवारी (१८ ऑक्टोबर) अटक केली. त्यांनी या खूनासाठी जवळपास २ महिने तयारी केली आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर अशा १ महिन्याच्या काळात पाच जणांचा खून केला. एकाच महिन्यात या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने संशय निर्माण झाला आणि हे प्रकरण उघड झालं. याशिवाय घरातील दोन सदस्य आणि एका चालकालाही अशीच लक्षणं आढळल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

संघमित्रा अकोला जिल्ह्यातील रहिवासी होती. तिचं डिसेंबर २०२२ मध्ये रोशन कुंभारेशी लग्न झालं. मात्र, या लग्नाला संघमित्राच्या कुटुंबाचा विरोध होता. या विरोधाला डावलून संघमित्राने रोशनशी लग्न केलं आणि ती त्याच्या घरी गडचिरोलीतील महागाव येथे आली. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच संघमित्राचा हिरमोड झाला. तिला तिच्या नवऱ्याकडून मारहाण व्हायला लागली. त्यामुळे संघमित्रा कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळली. सासरचे इतर लोकही रोशन संघमित्राला मारहाण करत असताना अपमानास्पद बोलत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संघमित्राला सासरी होत असलेल्या त्रासाची माहिती तिच्या वडिलांना समजली. त्यानंतर तिच्या वडिलांनी एप्रिलमध्ये अकोल्यात गळफास घेत आत्महत्या केली. याने संघमित्राला धक्का बसला.

रक्षाबंधनच्यावेळी संघमित्राला तिच्या माहेरी जायचं होतं. मात्र, तिचा नवरा रोशन आणि सासरच्या लोकांनी तिला माहेरी जाऊ दिलं नाही. तिने आग्रह केल्यानंतर घरात वाद झाला आणि रोशनने पत्नी संघमित्राला मारहाण केली. यानंतर संघमित्रा घराबाहेर रडत बसली. यावेळी रोसा रामटेकेने तिला आधार दिला. यावेळी संघमित्राने तिला सासरच्यांचा जीव घ्यावा वाटतो, अशी भावना रोसासमोर व्यक्त केली. रोसाचा संघमित्राच्या घरच्यांशी वडिलोपार्जित जमिनीवरून वाद होता. तिने संघमित्राच्या रागाला संधी म्हणून पाहत तिला भडकावलं. तसेच सासरच्यांना मारण्यासाठी तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

हेही वाचा : प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलगी, जावयाची निर्घृण हत्या; गोवंडी पोलिसांकडून चौघांना अटक

यानंतर संघमित्रा आणि रोसा दोघींनी खून करण्याच्या पद्धतींविषयी गुगलवर माहिती मिळवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी एक विषारी फुल खरेदी केलं. मात्र, ते जेवणात घातलं तर आपण पकडले जाऊ अशी भीती त्यांना वाटली. त्यांनी हे फुल जेवणात घालण्याचं रद्द केलं. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये तेलंगणातून ‘स्लो पॉयझन’ मागवलं आणि जेवणातून सासरच्या लोकांना खाऊ घातलं. यानंतर या घरातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर चालकासह अन्य दोन सदस्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.