तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनी आपला पक्ष भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) देशभरात नेण्याचं ठरवलं आहे. त्याला महाराष्ट्रातून सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक माजी आमदार-खासदारांसह मोठ्या नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही बीआरएसने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोठा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बीआरएसच्या आधी दोन वर्षापूर्वीच इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना एमआयएममध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडेंना याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकजण आपला पक्ष वाढवू शकतात. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे,” असं असदुद्दीने ओवैसी यांनी सांगितलं.

हेही वाचा : “सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलं होतं, पाटण्यात जाऊन…”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले. त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होतील. तसेच, विद्यार्थ्यांच्या व्हिसाचा प्रश्न लवकर सुटेल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेत असताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितलं की, ‘भारतात अल्पसंख्याक मुस्लिमांना लक्ष्य केलं जातं आहे. यामुळे भारताचे नुकसान होईल.’ हे ते बराक ओबामा आहेत, ज्यांना पंतप्रधानांनी हाताने चहा पाजला,” असा टोला ओवैसींनी मोदींना लगावला आहे.

हेही वाचा : “हा तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधला प्रभाकर मोरे केअर फंड”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; ओबामांचाही केला उल्लेख!

“अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरे गेले. अन्यथा आपल्या आवडीच्या निवेदकांना बोलवून मुलाखती देतात,” असा टोमणाही ओवैसींनी मोदींना मारला आहे.