लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : अकलूज येथे झालेल्या मोटारीच्या अपघातात दोन तरूण जागीच मृत्युमुखी पडले. तर अन्य दोघे जखमी झाले. रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू

राहुल बापूसाहेब कोळेकर (वय २४, रा. उघडेवाडी, ता. माळशिरस) आणि समाधान सरतापे (वय २४, रा. खुडूस, ता. माळशिरस) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. तर शुभम बाळू चव्हाण (वय २३) आणि यश नवनाथ शिंदे (वय २०, दोघे रा. वेळापूर, माळशिरस) हे जखमी झाले.

आणखी वाचा-केळी निर्यातीत मोठा वाटा असूनही सोलापूर केळी उत्पादन सूचीत नाही

हे चौघे मित्र निसान कंपनीच्या टोरानो गाडी ( एमएच ४५ एन ००८ ) या मोटारीतून रात्री अकलूजमध्ये महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे येत होते. परंतु भरधाव वेगात असलेल्या मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला दोन झाडांना आणि मैलाच्या दगडाला धडकली आणि उलट फिरली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारीत पाठीमागे आसनावर मध्यभागी बसलेला राहुल कोळेकर यांच्या डोक्याची फुटून बाहेर रस्त्यावर उडून पडली होती. अन्य दोघांना जखमी अवस्थेत तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. बेदरकारपणे मोटार चालविताना नियंत्रण सुटल्यामुळे काही क्षणातच हा अपघात झाला. अकलूज पोलीस या अपघातप्रकरणी तपास करीत आहेत.

Story img Loader