दापोली : दापोली तालुक्यातील सडवे येथे चार ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास सडवे येथील नदीवर गंभीरडोह येथे सडवे गावातील दोन युवक मासे पकडण्यासाठी गेले असता पाय घसरून पडून बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुजीत सुभाष घाणेकर (वय २५) आणि आयुष अनिल चिनकटे (वय २१) असे दोघे सडवे येथील जालगांव पाणी योजनेच्या ठिकाणी प्रथम गेले होते. मात्र जालगांव ग्रामपंचायतीचे पंप हाऊस कर्मचाऱ्यांनी तेथे जाण्यास रोखल्यामुळे ते दोघे गंभीर डोह येथे सायंकाळी पाचच्या सुमारास गेले. तेथे पाय घसरून पाण्यात पडले. पाणी खोल असल्याने नाका तोंडात पाणी गेल्याने ते दोघे बुडाले. सायंकाळी उशिरा या दोन युवकांचे मृतदेह सापडले.

आणखी वाचा-राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…

दोन्ही मृतदेह मिळाल्यानंतर तातडीने शवविच्छेदनासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून शवविच्छेदन करुन ताब्यात देणार आहे. या प्रसंगामुळे दिवाळी संपताच सडवे गावावर शोककळा पसरली आहे.