Devendra Fadnavis on Anil Deshmukh: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. आधी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं. त्यावर पुन्हा अनिल देशमुखांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं असून यावर आता ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करतानाच भाजपाची ही सवयच असल्याची टीका ठाकरे गटानं केली आहे.

देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख

अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक दावा केला. “आदित्य ठाकरेंनी दिशा सलियानवर बलात्कार करून तिला गच्चीवरून ढकलून दिलं, उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकीसाठी आपल्याला पैसे जमवायला सांगितले, याशिवाय अनिल परब अजित पवार यांच्याविरोधात आरोप करणारे चार प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या माणसाकरवी आपल्यावर टाकला. अन्यथा अटक करण्याची धमकीही दिली”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”

या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना उलट देशमुखांनाच आव्हान दिलं. “आमच्याकडे अनिल देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत. त्या बाहेर काढू”, असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलं. या सगळ्या प्रकरणावर सामना अग्रलेखातून फडणवीसांवर व भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

“..हा भाजपाचा अलिकडचा मूळ धंदा”

“फडणवीस यांनी हे जे उपद्व्याप केले, त्याचे ‘पेन ड्राईव्ह’ पुरावे आपल्याकडे आहेत. ते आपण बाहेर काढू’, असे देशमुखांनी जाहीर करताच फडणवीस यांनी ‘आमच्याकडेही देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत, त्या बाहेर काढू. मग बघा!’ असा दम भरला. म्हणजे फडणवीस यांनी भाजपच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवलेच. विरोधकांचे फोन चोरून ऐकणे, फोन रेकॉर्ड करणे, व्हिडीओ क्लिप करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणे व पुढे त्या माध्यमातून आपल्या राजकीय विरोधकांना ब्लॅकमेल करणे हा अलीकडचा मूळ धंदा झालाच आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं टीका केली आहे.

“मुख्यमंत्री ठाकरे व इतर तिघांविरुद्ध आम्ही सांगतो ते आरोप करा, तशा प्रतिज्ञापत्रांवर सही करा. मग आम्ही हे सरकार पाडतो व तुमची अटक टाळतो’, असा हा सौदा होता”, असा दावाही ठाकरे गटानं केला आहे.

Anil Deshmukh on Devendra Fadnavis: “आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…”, अनिल देशमुखांचं मोठं विधान; देवेंद्र फडणवीसांवरही केले गंभीर आरोप!

रश्मी शुक्ला प्रकरणावरून टीका

“राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी त्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फडणवीस यांच्यासाठी किमान विसेक राजकीय विरोधकांचे फोन ‘चोरून’ ऐकले व या भयंकर गुन्ह्याची चौकशी ठाकरे सरकारच्या काळात सुरू झाली. शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पण भाजपाने आमदारांना विकत घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये करणाऱ्या शुक्ला यांना सरळ राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले. त्यामुळे ‘क्लिप्स’ वगैरे प्रकरणात फडणवीस यांना भलताच रस आहे”, असा टोलाही अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

“देवेंद्र फडणवीसांनी भाजपातील अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स कोणी केल्या व प्रसारित केल्या हे जगाला माहीत आहे. ‘क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे”, असा आरोपही ठाकरे गटानं केला आहे.

Story img Loader