पुण्यातील कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याबाबत माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. “कात्रज चौकात लवकरच माजी जाहीर सभा होते आहे. त्यामुळे मागून हल्ला केल्यापेक्षा हिंमत असेल तर समोरून हल्ला करा, मी तारीख आणि वार देतो”, असे आव्हान त्यांनी हल्लेखोरांना केले आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

“मी मुंबईला असताना पुण्यातील काही पदाधिकारी मला भेटायला आले होते. त्यांना माझा सत्कार घ्यायचा होता. तेंव्हा मी त्यांना सांगितले की जर तुम्हाला पुण्यात माझा सत्कार घ्यायचा असेल, तर तो कात्रजच्या चौकात घ्या, त्यामुळे मी लवकरच कात्रज चौकात जाहीर सभेला संबोधित करणार आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच मागून वार केल्यापेक्षा मी कार्यक्रमाची तारीख आणि वार देतो.”, असे आवाहनही त्यांनी हल्ला करणाऱ्यांना केले आहे.

हेही वाचा – मुंबईत १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

कात्रज चौकात झाला होता हल्ला

पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १० ते १२ जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली होती. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला होता. आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर तेथून उदय सामंत ताफा जात होता. यावेळी सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राजेश पळसकर, संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, चंदन साळुंके यांना अटक करण्यात होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Story img Loader