शिवेसना पक्षातील बंडखोरीमुळे यंदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. या दोन्ही दसरा मेळाव्यांत दोन्ही गटातील मुख्य नेत्यांनी रोखठोक भाषण केले. या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर सडेतोड टीका केली. शिंदे यांनी तर साधारण दीड तास भाषण केले. एकनाथ शिंदे यांच्या या भाषणामुळे शिंदे गटातील अन्य नेत्यांना आपले विचार मांडण्यास पुरेशी संधी मिळाली नाही. यावर शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. सर्वांनी भाषण केले असते तर रात्रीचे ११ वाजले असते. कोणी नाराज असण्याचे कारण नाही, असे उदय सामंत म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व मंतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट-भाजपाकडून कोणाला उमेदवारी? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

भाषण करणाऱ्यांमध्ये माझे नाव होते. मात्र भरपूर वेळ झाल्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन थांबणे गरजेचे होते. सर्वांनीच भाषण केले असते तर रात्रीचे ११ वाजले असते. त्यामुळे मी भाषण करत नाही, असे मी एकनाथ शिंदे यांना स्वत:हून सांगितले. त्यामुळे कोणी नाराजी वगैरे असण्याचे कारण नाही. दसरा मेळाव्यासाठीच्या पूर्ण नियोजनामध्ये मी होतो, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व मंतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट-भाजपाकडून कोणाला उमेदवारी? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

एकनाथ शिंंदे यांना राज्यातील जनतेने स्वीकारले आहे. शिंदे याचे विचार ऐकण्यासाठी तिप्पट चौपट गर्दी होती, असेही सामंत म्हणाले. बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्यातून शिवसेना हा पक्ष कोणाचा हे स्पष्ट झालेले आहे. शिवाजी पार्कवर किती खुर्च्या लागतात, किती माणसे बसू शकतात याची याची माहिती मुंबई महापालिका तसेच पोलिसांकडेही आहे. अशाच प्रकारची माहिती बीकेसी मैदानाकडेही आहे. त्यामुळे स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी आमचाच दसरा मेळावा अतिविराट झाला, असे ते म्हणत आहेत. एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी तिप्पट, चौपट गर्दी होती. एकनाथ शिंदे यांना जनतेने स्वीकारलेले आहे, असा दावाही उदय सामंत यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant comment on eknath shinde group dussehra melava speech opportunity prd
Show comments