राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याचा दावा अनेकजण करत आहेत. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्याप्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. या पत्रानंतर राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावर वारिशे यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य करताना शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. तसेच करत शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? अस सवालही त्यांनी केला आहे. राऊतांच्या या ट्वीटनंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “कोण रोहित पवार?” प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या माझ्या…”

अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात

“संजय राऊतांना जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. हा फोटो नाकारण्याचे काही कारण नाही. कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होते. अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात. तसाच तोही एक फोटो होता. तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्या व्यक्तीचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेही ते पाहिलेले आहे. जो कोणी नेता त्याच्यासोबत आहे, तो यामध्ये सामील आहे, असे घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही असे मला वाटते,” अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

हेही वाचा >>> Shashikant Warishe Murder: “…आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली” संजय राऊतांचं मोठं विधान!

माझी एक इंचही जमीन असेल तर मी…

“संजय राऊत यांनी पत्रकाराच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या मागणीचे मी पूर्ण समर्थन करतो. माझी, माझ्या नातेवाईकांची त्या ठिकाणी एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र जमीन नसेल तर ज्यांनी तसे आरोप केले आहेत, त्यांनी राजकारण सोडायला हवे,” असे आव्हानही उदय सामंत यांनी केले.

हेही वाचा >>> “राज्यात ढासळणारा कायदा…” पत्रकार शशिकांत वारिशेंच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

संजय राऊतांनी काय दावा केला?

संजय राऊत यांनी ट्विटरवर उदय सामंत यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचा संबंध त्यांनी शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे. ट्वीटमध्ये संजय राऊत “व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारिशे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी जमीन खरेदी केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर?” असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant given clarification on photo tweeted by sanjay raut related with journalist shashikant varishe death prd
Show comments