मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. आता अजित पवार यांनी स्वत: पक्षातील जबाबदारी मिळावी आणि विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे, शिंदे गटातील काही नेत्यांकडून अजित पवारांना त्यांच्या पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिलं जातं आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवारांच्या विधानावर भाष्य केलं आहे. आमच्या पक्षात कुणाला घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही, हा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे, असं विधान उदय सामंत यांनी केलं. ते पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांनी पक्षातील जबाबदारीबद्दल केलेलं विधान आणि शिंदे गटातील नेत्यांकडून दिलं जाणारं आमंत्रण याबद्दल विचारलं असता उदय सामंत म्हणाले, “आमच्या पक्षात येण्यासाठी आमंत्रण देण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. आमच्या पक्षात कुणी यायचं? आणि कुणाला पक्षात घ्यायचं? हे एकनाथ शिंदे ठरवतात. कारण तेच शिवसेनेचे मुख्य नेते आहेत.”

हेही वाचा- “…याचा अर्थ अजितदादांची राष्ट्रावादीत जास्त घुसमट होतेय”, शिंदे गटाच्या नेत्याचं थेट विधान

“दुसरी महत्त्वाची गोष्टी अशी आहे की, अजित पवारांनी काय भाषण केलं? यापेक्षा मागील आठ दिवसांत घडलेल्या गंमती-जमती मी तुम्हाला सांगतो. एकीकडे ठाकरे गटाचे नेते सांगतायत की, पंतप्रधान मोदी हे अकार्यक्षम आहेत. ते काम करत नाहीत. त्यांनी मणिपूरला जावं.दुसरीकडे, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या दोन बाजुंच्या विधानांमुळे तुमच्या लक्षात आलं असेल की, वज्रमूठ किती मजबूत आहे” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा- “द गद्दार फाईल्स: मोदी-शाहांनी लबाडी करून…”, भाजपा मंत्र्याच्या विधानाचा दाखला देत अंबादास दानवेंचा हल्लाबोल!

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले आणि गेले वर्षभर काम केले. पण काही नेत्यांचं म्हणणं आहे की, मी कठोर वागत नाही. मग मी सत्ताधारी नेत्यांचं कॉलर पकडायला हवी का? पण आता हे पुरे झाले, मला पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या.’’ या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते.