पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुंबईतील निवास्थानावर ईडीने धाड टाकली आहे. वारंवार नोटीस बजावूनही राऊत टाळाटाळ करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही राऊतांना याच भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात लोकप्रतिनिधींनी बोलू नये, असा सल्ला बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिला आहे.
तपास यंत्रणेच्या कारवाईत लोकप्रतिनिधींनी बोलणे चुकीचे
“शिवसनेकडून ही कारवाई सुडबुद्दीने करण्यात येत असल्याची टीका करण्यात आली आहे. हे त्यांच व्यक्तिक मत असू शकते. परंतु केंद्राची किंवा राज्याची एखादी तपास यंत्रणा कारवाई करत असेल त्यावर लोकप्रतिनिधी म्हणून बोलणं उचित नाही. संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरत असतं. त्यामुळे त्यावर जास्त बोलणं योग्य नाही”. आम्हीसुद्धा बाळासाहेबांचाच विचार घेऊन राजकारण, समाजकारण करतो. त्यामुळे कितीही ईडी कारवाई झाली तरी शिवसेना सोडणार नाही, बाळासाहेबांचा लढाऊपणा सोडणार नाही. असं म्हणाऱ्या संजय राऊतांनाच याचा अर्थ माहिती असेल”, असेही सामंत म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा- “यापूर्वीच त्यांना अटक व्हायला हवी होती”; ईडी कारवाईनंतर नवनीत राणांची राऊतांवर टीका
मी ईडीचा अधिकारी नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
“संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी होऊ द्या. त्यांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही. त्यामुळे ‘कर नाही त्याला डर कशाला’ असायला हवी. ते ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकासआघाडीचे मोठे नेते होते. दरदिवशी ९ वाजता तुम्ही त्यांची बाईट घेत होते.” “राऊतांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.