ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. अशातच आता राजकारणी मंडळीदेखील या आत्महत्या प्रकरणावरून राजकीय भाष्य करत आहेत. नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यानी मोठं वक्तव्य केलं आहे. नितीन देसाई यांचं दुःख काय होतं हे सांगायला आम्ही तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं वक्तव्य सामंत यांनी केलं आहे. दरम्यान, सामंत यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उदय सामंत म्हणाले, “नितीन देसाई हे जितके माझ्या जवळचे होते, तितके ते दुसऱ्या कोणाच्याच जवळचे नव्हते. नितीन देसाई जायच्या एक महिना अगोदर मला भेटले होते. ज्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, त्या कोणालाच सांगितल्या नसतील. कोणाला कळल्या नसतील तर त्या मी सांगतो. नितीन देसाई यांचं दुःख काय होतं हे जर मी बाहेर काढलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय गोष्टी करण्यापेक्षा आपण पाच वर्ष काय केलं, गेल्या ७ वर्षात, ९ वर्षात काय केलं हे जनतेला सांगण्याची वेळ आली आहे.” दरम्यान, उदय सामंत यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा

हे ही वाचा >> “नवाब मलिक अजित पवारांच्या गटात…” राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

‘एडलवाईज’चे शाह आणि बन्सल उच्च न्यायालयात

नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी एडलवाईज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे अध्यक्ष रसेश शाह आणि एडलवाईस अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज कुमार बन्सल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. देसाई यांनी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेली परिस्थिती विशद करणाऱ्या ध्वनीचित्रफिती मागे ठेवल्या होत्या. त्यानंतर देसाई यांच्या पत्नी नेहा यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी शाह आणि बन्सल यांच्यासह एडलवाईज समुहातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.