प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू हे मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रीपद न मिळाल्याने ते वारंवार आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे महायुतीतील मंत्रीमंडळ विस्ताराचा पेच वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. त्यानंतर १८ जुलैला ते आपली भूमिका मांडणार आहेत, अशी माहिती बच्चू कडूंनी स्वत: पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच, महाविकास आघाडीच्या काळात आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव तेव्हाच मंजूर झाला असता तर माझ्यावर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती, असंही बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडूंच्या नाराजीवर आता शिंदे गटाचे आमदार व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला धोका”, अजित पवारांचा उल्लेख करत एकनाथ खडसेंचं मोठं विधान!

बच्चू कडू यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बच्चू कडूंच्या नाराजीवर भाष्य करताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, “बच्चू कडूंशी माझं सकाळपास दोन-तीन वेळा बोलणं झालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्यांच्याशी बोलले आहेत. बच्चू कडू स्पष्ट म्हणाले आहेत की, ते १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.”

हेही वाचा- उद्धव ठाकरेंशी युती करणार का? राज ठाकरे क्षणभर थांबले, मिश्किल हसले अन्

“या युतीमुळे एकनाथ शिंदे मंत्रीपदाच्या पेचात असतील तर मला मंत्रीपदापासून अलिप्त ठेवलं तरी चालेल, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. तरीदेखील मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले. पत्रकार परिषदेत बच्चू कडूंनी हेदेखील सांगितलं की, एकनाथ शिंदे हे दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. या कामासाठी मला एकनाथ शिंदेंचं गुलाम बनूनदेखील राहायला आनंद वाटेल, असा शब्दप्रयोग स्वत: बच्चू कडूंनी केला आहे. बच्चू कडू हे सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आहे. दिव्यांगांसाठी अतिशय मोठी कामं त्यांनी केली आहेत. दिव्यांग आणि उपेक्षित वर्ग हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. या दोन्ही घटकाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री न्याय देत आहेत. त्यामुळे बच्चू कडू १७ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत,” असंही सामंत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant reaction on bachchu kadu upset cabinet expansion eknath shinde rmm
Show comments