महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत, असं सांगण्यात आलं आहे. यावरून शिंदे गटाकडून भाजपाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली जातेय. यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“गेले सात आठ वर्ष देशात मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार आहे. महाराष्ट्रात, देशातील प्रत्येक राज्यात विकासात्मक काय बदल घडलेत हे सर्वांना माहितेय. त्यामुळे देशातील नागरिकांनी ठरवलं असेल की नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करावं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आणि शिवसेना महाराष्ट्रात काम करतंय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांघिकपणे काम करताहेत. म्हणून मला वाटतंय की महाराष्ट्रात या दोघांनी गेल्या अकरा महिन्यांत जे काम केलंय त्याची महाराष्ट्राने नोंद घेतली आहे. म्हणून शिंदे फडणवीसांचा हा विजय आहे. सर्व्हे झाला म्हणजे आमची जबाबदारी वाढली आहे. हा विजय टिकवणं ही आमची जबाबदारी आहे. त्याचमाध्यमातून शासन तुमच्या दारीसारखे उपक्रम होत आहेत. एकनाथ शिंदे एक नंबरला असले आणि देवेंद्र फडवणवीस उपमुख्यमंत्री असले तरीही हे या दोघांचं सांघिक यश आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा >> केंद्रात नरेंद्र तर महाराष्ट्रात देवेंद्र ही २०१४ ची घोषणा संपुष्टात? लोकप्रियतेत एकनाथ शिंदेंची फडणवीसांवर मात

“सरकार कसं चाललं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस हे युतीतील नेते आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांत महाराष्ट्र सक्षमपणे चालवला. समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ यासारखे प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या कालावधीतील आहेत. मागच्या अडीच वर्षांत सगळीकडे स्पीड ब्रेकर होते. सरकारकडून कामे होत नव्हती. अकरा महिन्यांपूर्वी जी घडामोड झाली त्यातून शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं”. असंही सामंत म्हणाले. तसंच, “देवेंद्रजींच्या अनुभवाचा फायदा एकनाथ शिंदेंना होतोय”, असंही ते पुढे म्हणाले.