‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकरण चांगलेच तापलं आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. हा प्रकल्प गुजरातला कसा गेला? याची काही कारणंही त्यांनी सांगितली आहे.

विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पुढे जावा, म्हणून सर्वांनी सांघिक प्रयत्न केले पाहिजेत. पण काहीजण पत्रकार परिषद घेत आहेत. महाराष्ट्राने एवढं पॅकेज दिलं होतं, मग हा प्रकल्प गुजरातला का गेला? असा सवाल येथे उपस्थित होतो. उद्योगमंत्री या नात्याने महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगितलं पाहिजे की, हा प्रकल्प गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करतोय. आठ महिन्यात त्यांना विशिष्ट सवलती द्यायच्या होत्या. आठ महिन्यात वीजेच्या दरात सवलत द्यायची होती. गुजरातने जशी जमीन दिली, त्या पद्धतीची जमीन उपलब्ध करून द्यायची होती.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…

“आता दोन महिन्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे, त्यामुळे वाईट झालं तर सगळं खापर त्यांच्यावर फोडायचं आणि चांगलं झालं तर आमच्यामुळे झालं म्हणायचं, ही राजकारणातील वाईट प्रवृत्ती वाढीला लागली आहे, याचा मी जाहीरपणे निषेध करतो” असा पलटवार उदय सामंत यांनी केला आहे.

हेही वाचा- Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात वाद; PM मोदी म्हणाले, “हा करार…”

पुढे त्यांनी सांगितलं की, हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांपासून प्रयत्न करतोय, दरम्यान सवलतीबाबतच्या काही योजना शासनासमोर ठेवण्यात आल्या होत्या. दोन महिन्यापूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर वेदांत कंपनीला आणखी काही जास्तीच्या सवलती देता येतील का? याबाबत अनेक बैठका झाल्या. एवढंच नाही तर वेदांतचे प्रमुख अनिल अगरवाल यांच्याशी देवेंद्र फडणवीस स्वत: बोलले होते. इतर राज्यांच्या तुलनेत आणखी काही द्यायचं असेल तर महाराष्ट्र द्यायला तयार आहे, अशी भूमिका त्यांची होती.

हेही वाचा- Vedanta Foxconn Project: “…त्यामुळे प्रकल्प गुजरातमध्ये” गेल्याचं सांगत अजित पवारांचं CM शिंदेंना पत्र; विनंती करत म्हणाले, “महाराष्ट्राच्या…”

पण मागच्या सात ते आठ महिन्यात त्यांना जो अनुभव आला, त्यामुळे कदाचित त्यांनी गुजरातला प्रकल्प नेण्याचा निर्णय घेतला असावा, त्यामुळे उगीच दुसऱ्यांवर खापर फोडण्यापेक्षा रिफायनरीचं तुम्ही काय करणार आहात? याचं उत्तरदेखील महाराष्ट्राला द्यावं. फक्त टीका करायची आणि राजापूर रिफायनरीच्या बाबतीत खासदारांना विरोध करायला सांगायचं, रिफायनरीच्या बाबतीत दुटप्पीपणा करायचा, हे सर्व महाराष्ट्राच्या समोर आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदे स्वत: पंतप्रधान मोदींशी बोलले आहे. हा प्रकल्प जरी गुजरातला गेला असला तरी याच तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ आणि युवा पिढीला जो रोजगार अपेक्षित आहे, तो उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन मोदींनी दिल्याचंही उदय सामंतांनी सांगितलं.