एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना ( ठाकरे गटाच्या ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचं वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रात छापलं असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.

उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, “दीड वर्ष एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपा आणि शिवसेनेच्या निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. तसेच, पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असतील,” अशी आशा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.

Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
Uday Samant on Eknath Shinde
Uday Samant: उदय सामंत एकनाथ शिंदेंपासून फारकत घेणार? थेट दावोसवरून व्हिडीओद्वारे उदय सामंत यांचा राऊत, वडेट्टीवारांना इशारा…
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?

हेही वाचा : “कोण संजय राऊत?”, भर पत्रकार परिषदेत अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न; नेमकं काय घडलं वाचा

सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद झाला, तर ८० टक्के कटुता संपेल, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. त्यावर प्रश्न विचारला असता, उदय सामंत यांनी म्हटलं, “ही फक्त देवेंद्र फडणवीस नाहीतर महाराष्ट्राची मागणी आहे. यात काहीही वावगं नाही. संजय राऊत त्यांच्यात आणि आमच्यातच कटुता वाढवत आहेतच. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही ते कटुता वाढवण्याचं काम करत आहेत. आपण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्यासाठी संजय राऊत वागतात.”

हेही वाचा : “भाजपाने काही पोपट पाळून ठेवले आहेत, त्यांना…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा खारघरचे प्रकरण दाबण्यासाठी आहे, यावर प्रश्न विचारल्या उदय सामंत यांनी सांगितलं, “या प्रश्नाला फारशी किंमत देत नाही. अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. खारघरच्या घटनेचं राजकीय भांडल करू नये, असं आमचं मत आहे.”

Story img Loader