राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मृत्यूप्रकरणावर भाष्य करताना शिंदे गटातील नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा एक फोटो पोस्ट केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पत्रकार शशिकांत वारिशे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी जमीन खरेदी केली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यावरच आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या भागात एक इंचही जमीन माझी असेल तर मी राजकारण सोडून देईल, असे सामंत म्हणाले आहेत. ते आज (११ फेब्रुवारी) माध्यम प्रतनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>> पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ, आता खुद्द संजय राऊतांनीच दिलं स्पष्टकीरण, म्हणाले, “हा आरोपी…”

मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो की…

“मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबाची राजन साळवी, विनायक राऊत यांनी भेट घेतली आहे. पत्रकाराचा मृत्यूची घटना ही दुर्दैवी आहे. पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वत: पुढाकार घेणार आहे. संजय राऊत यांनी नाणार प्रकल्पाच्या भागात जमिनी कोणाच्या आहेत. कोण दलाल आहेत? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो की त्या ठिकाणी माझी तसेच माझ्या नातेवाईकांची एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र हे सिद्ध झाले नाही तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी राजकारण सोडायला हवे,” असे खुले आव्हान संजय राऊत यांना उदय सामंत यांनी त्यांचे नाव न घेता दिले.

हेही वाचा >>>> पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांच्या एका ट्वीटमुळे खळबळ, उदय सामंतांना द्यावे लागले स्पष्टीकरण; म्हणाले “तो फोटो…”

संजय राऊत यांना धमक्या येत असतील तर ..

“लोकशाहीमध्ये पत्रकाराने विरोधात लिहिले तर याकडे आपण खिलाडू वृत्तीने पाहिले पाहिजे. संजय राऊत यांना धमक्या येत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या सुरक्षेच्या बाबतीत तडजोड होता कामा नये, ही आमची इच्छा आहे. मात्र आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी दुसऱ्यांना बदनाम करणे हे तत्वाला धरून नाही, असे माझे मत आहे,” असेही उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा >>>> कोण रोहित पवार?” प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या माझ्या…”

संजय राऊत यांनी काय आरोप केला?

संजय राऊत यांनी उदय सामंत यांचा एक फोटो आपल्या ट्विटर खात्यावर प्रदर्शित केला होता. सोबतच “शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. कारण या प्रकरणात तेथील स्थानिक नेत्यांचा जिल्हा स्ताराच्या पोलिसांवर दबाव असू शकतो. नाणार रिफायनरी होऊ नये अशी आमची भूमिका होती. तीच भूमिका मृत्यू झालेल्या पत्रकाराचीही होती. प्रकल्प येणार आहे म्हणून बाहेरच्या श्रीमंत लोकांनी तेथे जमिनी खरेदी केल्या. याविरोधात ते लढत होते. त्यांचा आवाज बंद होत नाही, हे समजल्यानंतर वारिशे यांची हत्या करण्यात आली. शशिकांत वारिशे यांची हत्या ही राजकीय हत्या आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant said no land near nanar refinery project reject allegation made by sanjay raut prd
Show comments