अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने बुधवारी (१४ जून) सायंकाळी गो. ब. देवल स्मृतीदिन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार राहुल शेवाळे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना परिषदेच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दरम्यान, यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या राजकीय नाट्यावर भाष्य केलं.

उदय सामंत यावेळी भाषणादरम्यान म्हणाले, मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून इथे उपस्थित आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. आज संपूर्ण महाराष्ट्राची रंगभूमी या नाट्यगृहात जमली आहे. त्यांच्यासमोर तुम्ही (एकनाथ शिंदे) उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार.

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
savita malpekar marathi actress talks about groupism
“त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Marathi actor Swapnil Rajshekhar share interesting story behind the name Rajasekhar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम स्वप्नील राजशेखर खरं आडनाव का लावत नाहीत? ‘राजशेखर’ नावामागे आहे रंजक गोष्ट, वाचा…
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

उदय सामंत भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, मघाशी प्रशांतजी (अभिनेते प्रशांत दामले) बोलले की, राजकारणातले आम्ही लोक कलाकार आहोत. १० महिन्यांपूर्वी जे नाटक लिहिलं गेलं, दिग्दर्शित केलं गेलं, त्याची निर्मिती केली गेली, ते आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या नाटकाचं नाव होतं गुवाहाटी व्हाया सुरत. त्यामुळे तो शो ११ महिन्यांपूर्वी हाऊसफुल झाला तो आजही हाऊसफुलच आहे. कुठेही एकही माणूस कमी झाला नाही, उलट गर्दी वाढत आहे.

उदय सामंत म्हणाले, मघाशी वंदनाताई (अभिनेत्री वंदना गुप्ते) म्हणाल्या मुख्यमंत्री इथे काहीतरी देऊन जातील. मी सर्वांना सांगेन, मी १० महिने या मंत्रिमंडळात काम करतोय. मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना संवेदनशील मुख्यमंत्री अशी करतो. ज्या-ज्या मागण्या प्रशांत दामले यांनी मघाशी व्हीआयपी रूममध्ये केल्या. त्या मान्य करूनच मुख्यमंत्री इथून जातील. प्रशांत दामले यांना एक विश्वस्त म्हणून पाठिंबा देण्यासाठी मी इथे उभा आहे.