Uday Samant Won in Ratanagiri Vidhan Sabha रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १ लाख ११ हजार ३३५ मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची ६९ हजार ७४५ इतकी मते मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी सामाजिक न्याय भवन मध्ये शनिवारी सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक जनक प्रसाद पाठक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली. पहिल्या फेरीपासूनच सामंत हे आघाडीवर होते. निवडणूक निर्णय अधिकारी देसाई यांनी मतमोजणी नंतर सर्वाधिक मते मिळालेल्या सामंत यांना विजयी घोषित केले. यानंतर त्यांनी प्रमाणपत्र आणि बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक पाठक उपस्थित होते.

हेही वाचा…Maharashtra Election 2024: कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? श्रीकांत शिंदे म्हणाले “तुम्हाला सर्वांना लवकरच…”

विधानसभा निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे उदय रविंद्र सामंत – १ लाख १० हजार ३२७, टपाली मते-१ हजार ८ अशी एकूण १ लाख ११ हजार ३३५ मते पडली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे बाळ माने यांना ६८ हजार ८५४, टपाली मते- ८९१ अशी एकूण ६९ हजार ७४५ मते पडली. बसपाचे भरत सीताराम पवार यांना ९७२, टपाली मते ३० अशी एकूण १ हजार २ मते पडली. अपक्ष कैस नुरमहमद फणसोपकर यांना ३०७, टपाली मते ३ अशी एकूण ३०९ मते पडली. तसेच अपक्ष कोमल किशोर तोडणकर यांना १८८, टपाली मते ६ अशी एकूण १९४ मते पडली. अपक्ष ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील यांना १ हजार ७४, टपाली मते १८ अशी एकूण १ हजार ६१ मते पडली. अपक्ष दिलीप काशिनाथ यादव यांना२७५, टपाली मते ५ अशी एकूण २८० मते पडली. अपक्ष पंकज प्रताप तोडणकर यांना ५९९, टपाली मते ४ अशी एकूण ६०३ मते पडली. या निवडणुकीत नोटाला ३ हजार २९ तर टपाली मते ४४ एकूण ३ हजार ७३ पडली. एकूण वैध मते १ लाख ८५ हजार ५९३ , टपाली मते २ हजार ९ अशी एकूण १ लाख ८७ हजार ६०२ मते पडली.

हेही वाचा…Swara Bhaskar : पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करचा संताप; म्हणाली, “९९ टक्के चार्ज EVM उघडल्या अन्…”

रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांच्या विजयाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांचा आतषबाजीत सामंत यांची शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant secures victory in ratnagiri assembly with record votes psg