शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाकरता दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. वरळीतील नेस्को मैदानात शिंदे गटाचा कार्यक्रम होणार आहे. तर, षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांत आज भाषणांची जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामतं यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रावादीवरही जोरदार निशाणा साधला.

“महाराष्ट्रातील शिवदूत येथे येत आहेत. पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे. मुख्यमंत्र्यानी गेल्या दहा महिन्यांत काय केलं, हे जनतेसमोर आहे. अजून आम्ही भविष्यात काय करणार आहोत, हे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनातून समजेल. परंतु, आमच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. वंदनीय बाळासाहेबांचा विचार कशापद्धतीने पुढे नेला, कशामुळे दोन वर्धापन दिन झाले हे सर्वांना माहितये. शिवसेना आणि भाजपासोबत नैसर्गिक युती झाल्यानतंर हा पहिलाच वर्धापन दिन आहे. बाकीचे वर्धापन दिन हे महाविकास आघाडीचे आहेत”, अशी टीका उदय सामंतांनी केली.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त

“काँग्रेस जसं सांगतं तशी शिवसेना त्या मार्गावर चालते. शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून तळा-गाळात जे काम केलं ते आम्ही प्रेझेंट करू. शिवदुतांचा हजारो लोकांचा मेळावा आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा >> “…तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होतात, आता म्हणे…”, वर्धापन दिनी ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

गद्दारी कोणी केली?

“आमचा उठाव झाला होता. त्या उठावामुळे महाराष्ट्रातील जनता किती सुखी आहे हे आपल्या सर्वांनाच माहितेय. राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत ते उरलेल्या शिवसेनेचे प्रवक्ता बनले आहेत. हे आमच्या सर्वांचं पूर्वीपासून दुःख होतं. गद्दारी कोणी केली? शिवसेना-भाजप युतीतून आम्ही लढलो. बाळासाहेबांचा फोटो लावला. नरेंद्र मोदींचा फोटो लावला. मतं मागितली. सरकार स्थापनेच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वेळी गेलो. ही मतदारांसोबतची गद्दारी आहे. ही गद्दारी कोणी केली आहे मतदारांना माहिती आहे. खोके, गद्दार बोलून आमच्या व्यक्तिमत्त्वावर काही परिणाम पडेल असं आम्हाला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कतृत्त्वावर, हिंमतीवर मुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन कसा मिसळतो, मुख्यमंत्री घरात न बसता लोकांमध्ये कसा जातो, विकासाची कामे करतो हे देवेंद्रजींच्या सहकार्याने दाखवलं आहे. आम्ही नैसर्गिक युतीमध्ये आहोत. आम्ही स्वाभिमान आणि अभिमानाने सांगतो आम्ही जे केलं ते योग्य केलं आहे. कोणाला गद्दारी वाटो, खोके घेतले वाटो, पण जे खोके घेत होते त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये”, असंही ते म्हणाले.

शिंदे गट उद्या कोणता दिन साजरा करणार?

ठाकरे गटाकडून उद्या खोके दिन तर, राष्ट्रवादीकडून उद्या गद्दार दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट उद्या कोणता दिन साजरा करणार असा प्रश्न पत्रकारांनी उदय सामंतांना विचारला. “दहा महिन्यात एकनाथ शिंदेंनी सर्व टिकेला कामाने उत्तर दिलं आहे. मला वाटतं की आमच्यासाठी प्रत्येक दिवस जनतेचा विकास करण्याकरता दिन असला पाहिजे अशा मताचे आहोत. ज्यांना उद्योग नाहीत, ते अशापद्धतीचे बदनामकारक दिवस पाळतात. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर परिणाम होणार आहे. पुढच्या वेळी आमचंच सरकार पुन्हा सत्तेवर येईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“जयंत पाटील हे परिपक्व राजकारणी आहेत. वाण नाही पण गुण कसा लागतो याचं मूर्तीमंद उदाहरण म्हणजे जयंत पाटील. जयंत पाटलांनीच हे गद्दार दिनाचं काढलं. ते ज्यांच्या संगतीत आहेत त्यांचा गुण लागला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारीही साडेनऊ वाजता पीसी घ्ययाला सुरुवात करतील, अशी शंका समोर आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

Story img Loader