राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा सराईत गुन्हेगार असू तो खुनासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी कट कारस्थान रचतो. त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. त्याने दिलेल्या कबुली जबाबाची पोलिसांकडून प्राप्त झालेली माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आरोपी आंबेरकरशी आपला दुरान्वयेही संबंध नाही. त्यासाठी आपली लाय डिटेक्टर चाचणी करण्याची आपली तयारी आहे, असेही खुले आव्हान सामंत यांनी दिले आहे.
हेही वाचा- “मी त्यांच्या बापाला..,” ‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र!
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खून प्रकरणाशी मंत्री उदय सामंत यांचा संबंध आपण जोडणार नाही, असे सांगत उध्दव ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सावंत यांच्यासोबत आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची काढलेली छबी ट्वीट केली आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्री सामंत यांनीखासदार राऊत यांना प्रतिआव्हान देताना, पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत आणि राजन विचारे यांच्या सोबतही काढलेल्या छबी प्रसार माध्यमांसमोर आणल्या. अशा आरोपींनी मंत्री, नेत्यांसोबत काढलेल्या छबी म्हणजे त्या आरोपीच्या गुन्ह्यांशी त्या मंत्री वा नेत्यांचा संबंध जोडणे चुकीचेच आहे, असा निर्वाळाही सावंत यांनी दिला.
नाणार रिफायरी प्रकल्प होणाऱ्या परिसरात आपल्या किंवा कुटुंबीयांच्या मालकीची एक इंचही जमीन नाही. यासंदर्भात खुल्या चौकशीलाही आपली तयारी असल्याचा दावा सामंत यांनी केला.