राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची मोठी चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांतच राज्यात खातेवाटप होऊन मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येतंय. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळात आता राष्ट्रावादीच्या नऊ आमदारांचाही सहभाग वाढल्याने शिंदे गटातील आमदारांना किती खाती मिळतात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सोमवारी झाला नाही, आजही झाला नाही. उद्या किंवा परवा कधीतरी होईल. पण लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल”, असं उदय सामंत म्हणाले. “एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहिलं आहे. महाराष्ट्रातील विभागनिहाय माहिती त्यांच्याकडे आहे. कोणते आमदार कुठून आले आहेत हे संख्येनुसार माहितेय. त्यामुळे हे तिघेही अतिशय समन्वय आणि समतोलाने खातेवाटप करतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एखादा वरिष्ठ लोकप्रतिनिधी असेल तर त्याला चांगलं खातं मिळावं असा आग्रह असू शकतं, पण ते मिळेलच असं नाही”, असंही उदय सामंत म्हणाले.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
PM Narendra Modi On Mahavikas Aghadi
PM Narendra Modi : “महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; म्हणाले, भ्रष्टाचारात काँग्रेसची पीएचडी”

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती समजून घ्या, अशा अवस्थेत…”, ‘त्या’ टीकेवर पहिल्यांदाच बोलले देवेंद्र फडणवीस

काँग्रेससोबत गेलात तो राजकीय कलंक नव्हता का?

“२०१९ ला आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला. तेव्हा आम्ही जिंकलोही. पण काही लोक काँग्रेससोबत गेले, त्यावेळी तो राजकीय कलंक नव्हता का?” असा सवालही उदय सामंत यांनी उपस्थित केला. “त्यामुळे आपण केलं ते सोयीस्कर आणि दुसऱ्याने केलं तर ते वाईट ही राजकीय प्रवृत्ती योग्य नाही. काल घर फोडण्याचाही विषय आला. राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर काढणारे एकनाथ शिंदे नव्हते. क्षीरसागर यांचंही कोणी घर फोडलं हे अवघ्या महाराष्ट्राला माहितेय. मागच्या सरकारमध्ये धनजंय मुंडेंसोबत महाविकास आघाडी करून पंकजा मुंडेवर अन्याय केला”, असं उदय सामंत म्हणाले.

जनतेचा विकास करणे हेच आमचं ध्येय

“हॉस्पिटलमध्ये असताना मिटिंग झाल्या असं सांगतात. पण हॉस्पिटलमध्ये असातना किती मिटिंग झाल्या हे मलाही कधीतरी सांगावं लागेल. त्यांच्यावर टीका करत असताना तत्वाला विरोध आहे समजू शकतो. पण वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणं चांगलं नाही. त्यामुळे यांनी कितीही दौरे केले तरी महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त खासदार महायुतीचे निवडून येणार आहेत आणि २०० पेक्षा जास्त आमदार महायुतीचे निवडून येणार आहेत. मला असं वाटतं की स्वतःकडे असलेले आमदार आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता हा खटाटोप सुरू आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. जनतेच्या विकासाशी आम्ही बांधिल आहोत. जनतेचा विकास करणं हे आमचं ध्येय आणि धोरण आहे”, असंही उदय सामंत म्हणाले.