माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे या सध्या शिवशक्ती यात्रेनिमित्त राज्यभर दौरा करत आहेत. यात्रेनिमित्त त्यांनी आज साताऱ्यातील शिखर शिंगणापूरला भेट देली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खसदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं. तसेच पंकजा मुंडे यांना उदयनराजेंनी तलवार भेट दिली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. उदयनराजे म्हणाले, पंकजा मुंडे यांनी स्वतःसह या समाजाचं रक्षण करावं यासाठी मी त्यांना तलवार भेट दिली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, मी जेव्हा पंकजा मुंडे यांना पाहतो, त्यांची भाषणं ऐकतो, त्यांची भाषणशैली पाहून असं वाटतं की गोपीनाथ मुंडे भाषण करत आहेत. त्यांनी जी यात्रा हाती घेतली आहे त्याची नितांत आवश्यकता होती. पंकजा मुंडे आणि त्यांचे सहकारी समाजाला एकत्र ठेवण्याचं काम करत आहेत. आपण चांगलं करतो त्याला कर्म म्हणतात आणि या कर्मामुळेच पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्वल आहे.

guardian minster mps and mlas remain absence in marathwada liberation day event
मुक्तीसंग्राम कार्यक्रमाला लातूरमध्ये पालकमंत्र्यांपासून खासदार-आमदारांची दांडी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
satara police arrested couple for malpractice in majhi ladki bahin yojana
लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक
26 bjp activists from chhattisgarh allotted one constituency to win marathwada
मराठवाड्यात भाजपकडून छत्तीसगडमधील कायर्कर्त्यांची कुमक
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
What is the price of gold on Shri Krishna Janmashtami
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सोन्याचे दर बघून ग्राहक चिंतेत.. झाले असे की…

हे ही वाचा >> “पप्पांनी नऊ दिवस काहीच खाल्लं नाही, त्यांची…”, जरांगे पाटलांच्या मुलाचे डोळे पाणावले…

उदयनराजे भोसले म्हणाले, मी त्यांना तलवार भेट दिली आहे कारण त्या आजच्या काळातल्या रणरागिनी आहेत. क्षत्रीय समाजात तलवार हे शौर्याचं प्रतीक मानलं जातं. भवानीमातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. मी काही देव नाही, परंतु, एक मोठा भाऊ म्हणून मी त्यांना तलवार दिली आहे. हा समाज एकत्र ठेवण्यासाठी, समाजाच्या संरक्षणासाठी मी त्यांना तलवार दिली आहे. मनगट बघा तुम्ही त्यांचं, त्यांचं मनगट माझ्यापेक्षा मोठं आहे.