मी जी भूमिक घेत आहे, ती कोणाच्या विरोधात नाही, तर वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात आहे. मी शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. जर आज मी या विरोधात आवाज उठवला नाही, तर मला स्वत:ला शिवरायांचे वंशज म्हणण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. उदयनराजे उद्या (३ डिसेंबर ) रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा – “शिंदे गटात लवकरच स्फोट होईल”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “आमदार सोडून गेले म्हणून…”

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Supriya Sule criticizes Mahayuti over Uddhav Thackeray bag checking case Pune news
उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Uddhav Thackeray News Update News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, “अहो देवाभाऊ, जाऊ तिथे खाऊ, मुंब्र्याच्या वेशीवर..”

“अनेक महापुरुष आहेत, ज्यांनी चळवळीच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी आपले आयुष्य वेचले. मात्र, आज काही मुठभर लोकं त्यांचा अवमान करत असतील, तर तो अवमान मी सहन करू शकत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याकरिता आम्ही आज रायगड येथे जाण्यासाठी निघालो आहे. आम्ही आमच्या वेदना मांडण्याकरिता रायगडाला जातो आहे. आपल्या भावना व्यक्त करण्याचे रायगडपेक्षा दुसरं ठिकाण असू शकत नाही. आज जग व्यक्तीकेंद्रीत झालं आहे. प्रत्येकाला आपल्या स्वार्थापलीकडे काहीही दिसत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही आमच्या वेदना मांडू”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

हेही वाचा – “शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी करणाऱ्यांनाही उदयनराजे यांनी सुनावले. “आज एक जण बोलायला लागला की, उद्या दुसरा कोणी बोलायला लागतो. मुळात जे कोणी ही तुलना करत आहे, ते गौण आहेत. शिवरायांचा विचार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांची कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही. अशी तुलना करणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी आता त्यांच्या नेत्यांना कडकपणे समजावले पाहिजे”, असे ते म्हणाले.