छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज (१९ फेब्रुवारी) सकाळी नागपुरात शिवजयंती साजरी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करून देशभरातील नागरिकांना आणि शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही यंदा सातारा लोकसभेची जागा लढवणार का? त्यावर उदयनराजे भोसले म्हणाले, निवडणूक लढवावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.

उदयनराजे भोसले यांनी २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर साताऱ्याची लोकसभा निवडणूक जिंकली होती. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी त्यांनी खासदारकीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच भोसले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. उदयनराजे भोसले यांनी भाजपाच्या तिकीटावर ही निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. परंतु, या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपाने उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवलं.

In Devendra Fadnavis meeting Mukesh Shahane absconding from the police on the platform
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पोलिसांच्या लेखी फरार मुकेश शहाणे व्यासपीठावर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा

श्रीनिवास पाटील यंदा पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेची जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. परंतु, महायुतीत ही जागा कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. महायुतीत या जागेसाठी भाजपा अग्रही आहे. भाजपा पुन्हा एकदा उदयनराजेंना या मदतारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच राष्ट्रवादीचा अजित पवार गटही या जागेची मागणी करू शकतो. यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीनिवास पाटलांच्या उमेदवारीबाबत उदयनराजे भोसले म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला या लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा, मतदान करण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने मोठे तर आहेतच. त्याचबरोबर ते वडीलधारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना आव्हान देण्याचं वक्तव्य मी करणार नाही.

उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार आहात का? यावर उदयनराजे भोसले म्हणाले, “माझी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे का असा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्हीच सर्वांनी सांगा की, तुमची काय इच्छा आहे. खरंतर निवडणूक लढवावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्याला मी काही अपवाद नाही.”

हे ही वाचा >> भाजपा मविआला धक्का देणार? जयंत पाटील-विजय वडेट्टीवार संपर्कात? बावनकुळे म्हणाले, “आमच्या संकल्पाला साथ…”

उदयनराजे भाजपाच्या तिकीटावर साताऱ्यातून लोकसभा लढवणार?

दरम्यान, तुम्ही भाजपाकडून सातारा लोकसभा निवडणूक लढणार की वेळ पडल्यास ती जागा अजित पवार गटाला सोडणार? असा प्रश्नही भोसले यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर भोसले म्हणाले. नाही! तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यांचे सर्व सहकारीदेखील त्यादृष्टीने काम करत आहेत. भाजपा सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये देशाचा आणि राज्याचा विकास केला आहे. आपण नागपूरचं उदाहरण पाहू शकता. नागपूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरचा विकास केला आहे. केवळ नागपूर जिल्हाच नाही, तर भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात विकासकामं केली आहेत.