वाई:संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलल तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच.
साताऱ्यात उदयनराजे भोसले एका कार्यक्रमाला उपस्थित झाले होते,त्यावेळी पत्रकारांनी खासदार उदयनराजे यांना संजय राऊत यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेवर विचारण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.उदयनराजे भोसले यांनी राऊत यांचा उदयनराजे स्टाईलमध्ये इशारा दिला.संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलल तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच.
शिवेंद्रसिंहराजे यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारी वरून मत व्यक्त केले होते. त्यावरून संजय राऊत हे शिवेंद्रसिंहराजे यांना म्हणाले होते की, संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय हा छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती. यामध्ये कोल्हापूरचे संजय पवार आणि नंदूरबारचे पारवे यांचा नावाचा विचार सुरु होता. मात्र, आम्ही संजय पवार यांना संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात राज्यसभा निवडणुकी वरून वातावरण तापलेले असताना सहाव्या जागेवरून उदयनराजेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केल्याने याला महत्व आले आहे.
आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर ….असा इशारा राऊत यांना खासदार उदयनराजेंनी दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेवर खासदार उदयनराजे भोसले यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.