अजित पवार यांचे सातारा जिल्ह्यात दौरे वाढलेत कदाचित त्यांना येथूनच निवडणूक लढवावी असे वाटत असेल असे खा उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे. प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढविण्याची जबाबदारी असते त्यातून ते विधाने करतात, त्यात गैर काय. राष्ट्रवादीच काय उद्या कम्युनिस्ट पक्षाचे लोक म्हणतील. तसेच भाजपच्या लोकांनाही वाटते की आपला खासदार व्हावा, ही चांगली गोष्ट आहे. पण, यातून कोणी आव्हान दिले तर मी आव्हानांना भीक घालत नाही. आव्हान कोणाचे स्वीकारायचे हे मीच ठरवतो, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना लगावला.विरोधी पक्ष नेते अजित पवार काल (रविवारी) साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी २०२४ मध्ये सातारचा खासदार व आमदारही राष्ट्रवादीचा असेल असे वक्तव्य केले होते.

याबाबत खासदार उदयनराजेंना विचारले असता त्यांनी हा चांगला विचार आहे, असे म्हणत त्या वक्तव्याचे स्वागत केले. पण, यातून कोणी मला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर मी आव्हानाला भीक घालत नाही, असे प्रतिउत्तरही त्यांनी दिले.उदयनराजे म्हणाले, समाजकारण असू अथवा राजकारण प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. आपण जर व्यापकपणे विचार केला नाही, तर पुढेच जाऊ शकत नाही. ही तर लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. ते काय बोलले असतील. निश्चित चांगले विचार लोकांना दिले असतील.प्रत्येक नेत्याची आपला पक्ष वाढविणे जबाबदारी असते. त्यातून त्यांनी ही विधाने केली असतील. त्यात काही गैर नाही. आमदार, खासदार होणार असेल तर स्वागत आहे. खासदारकी बाबत बोलायचे झाले तर उद्या कम्युनिस्ट पक्षाची लोक म्हणतील आमचा खासदार हाोईल. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वाटते आपला खासदार व्हावा, ही चांगली बाब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar visits accident site decides to provide Rs 5 lakh assistance to families of deceased
अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MLA amol mitkari reaction on shashikant shinde and ajit pawar recent meeting
पवार गटाच्या आमदारांची अजितदादाशी भेट, मिटकरी म्हणाले “विरोधी बाकावर जीव रमत नसल्याने…”
Pankaj Bhoyar Minister post, Pankaj Bhoyar,
डॉ. भोयर यांना मंत्रिपद; इतरांची नाराजी, पण कुणबी-तेली वादाचा समन्वय
Ranjit Singh Mohite-Patil notice, Solapur,
सोलापूर : रणजितसिंह मोहिते यांना भाजपकडून पक्षशिस्तीची ‘कारणे दाखवा’ नोटीस
shetkari kamgar paksha general secretary jayant patil family divided nephew aswad patil resigns from party print politics news
शेकापच्या पाटील कुटुंबियात फूट; आस्वाद पाटील यांची वेगळी वाट
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण

अजित पवारांनी हे विचार मांडून तुम्हाला अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, मी आव्हानांना भीक घालत नाही. पण, आव्हाने कोणाची स्वीकारायची हे मी ठरवतो. आव्हानांसारखी लांबलचक बुद्धीभेद करणारे शब्द वापरु नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.काही लोक तंबी देण्याचं काम करत आहेत जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेने बघू नका. काही लोकांना असं वाटतं की हा भाग हा परिसर म्हणजे माझा आहे. मला हसु येते असे म्हणत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा मनात कधी असं मनात आले नसेल की हे माझं, ते माझं.

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे समाजामुळे मी आहे , माझ्यामुळे समाज नाही असं म्हणत नाव न घेता उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी एक चुक झाली २०१२ साली की मी प्रचाराला गेलो, मनोमिलन होते असे सांगत. स्वार्थ साधला गेला की काही लोक जसा सरडा रंग बदलतो तशी काही लोकांची खासियत असते असंही उदयनराजेंनी नमूद केले.

Story img Loader