वाई : उदयनराजें उद्या गुरूवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे .
उदयनराजे भोसले गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे महायुतीचे सातारा शहरात उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे. या शक्ती प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही वरिष्ठ नेते साताऱ्यात येणार असल्याने या रॅलीकडे लक्ष लागून राहिले आहे. साताऱ्यातील महायुतीचे सर्व आमदार आपल्या समर्थकांसह या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा-सोलापूर कमी कठीण, माढा जास्तच कठीण; चंद्रकांत पाटील यांची कबुली
राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मीच उमेदवार असे म्हणत आपला प्रचार सुरू केला आहे. भाजपच्या केंद्रीय सुकाणू समितीने उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली आहे .गुरुवारी खासदार उदयनराजे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे . समर्थकांनी याची जोरदार तयारी केली आहे . गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांना पाचरण करून जबाबदारी निश्चित करून दिली आहे. उदयनराजे यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. याशिवाय कराड उत्तर दक्षिण पाटण वाई येथील भाजपचे हजारो पदाधिकारी साताऱ्यात दाखल होणार आहेत.
आणखी वाचा-रामनवमीचे औचित्य साधून हिंदुत्व काँग्रेसचे अन् भाजपचे…
सजवलेल्या रथातून उदयनराजे यांची भव्य रॅली निघणार असून या रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता होणार आहे. उदयनराजे यांचा अर्ज दाखल करणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे हजर राहणार आहेत .महाविकास आघाडीच्या तोडीस तोड अशी रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे . महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते हे उद्या साताऱ्यात असल्याने साताऱ्याचा राजकीय पारा वाढलेला आहे . सांगलीमध्ये संजय पाटील हे शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करणार असल्याने साताऱ्यात उदयनराजे यांच्या समवेत उपस्थिती दर्शवून महायुतीचे नेते दुपारी सांगलीला जाणार आहेत . उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर साताऱ्यात महायुतीचे नेते काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे . उदयनराजे भोसले मित्र समूह, सातारा विकास आघाडी तसेच सहा मतदारसंघातील लोकसभा संयोजक आणि पदाधिकारी या भव्य राहिलेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या साताऱ्यात महायुतीचे विराट शक्ती प्रदर्शन घडवून अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात उदयनराजे भोसले हे अर्ज दाखल करतील .गांधी मैदानावरून रॅलीची सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साताऱ्यात येणार असल्याने साताऱ्यात बंदोबस्त वाढविण्यात आला असून मिरवणूक मार्गावरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आली आहे.