वाई : सातारा लोकसभा मतदारसंघातून झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले विजयी झाले. त्यांनी शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार २१७ मतांनी पराभव केला. त्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहरातून गुलालाची उधळण करत फटाके फोडून मोठी मिरवणूक काढली. साताऱ्यात उदयनराजे आणि शशिकांत शिंदे मध्ये मोठी लढत पाहायला मिळाली होती. पहिल्या फेरी पासून पहिल्या पंधरा फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांचे मताधिक्य वाढत होतं. पंधराव्या फेरीनंतर उदयनराजे यांनी आघाडी घेत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला.
उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये सातारा मतदारसंघात प्रथमच एवढी मोठी लढत पाहायला मिळाली. नंतर मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून उदयनराजे शशिकांत शिंदे यांनी पंचवीस हजार मतांची आघाडी घेतली. होती. शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येतात त्यांच्या कोरेगाव येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ती आघाडी तोडत उदयनराजे विजयाच्या जवळ पोहोचले. शशिकांत शिंदे यांना पाच लाख ३१ हजार १३२ मते मिळाली. उदयनराजे ३२ हजार(५ लाख ६३ हजार १६७) पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर राहिले. मतमोजणीत अचानक झालेल्या बदलाने साताऱ्यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होऊ लागले. सर्वजण माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून नक्की काय असं काय घडलं आहे का असे प्रश्न विचारू लागले. शशिकांत शिंदे यांची आघाडी तोडून उदयनराजे यांचे मताधिक्य वाढू लागताच कार्यकर्त्यांनी सातारा शहरात एकच जल्लोष केला. सातारकरांनी आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतील यावेळी प्रथमच चुरशीची निवडणूक अनुभवली. पहिल्या पंधरा फेर्यांपर्यंत शशिकांत शिंदे आघाडीवर आणि पुढच्या आठ फेऱ्यांमध्ये उदयनराजे विजयी असे विलक्षण आकडेवारी ही लोकांना पाहायला मिळाली. त्यामुळे उदयनराजेंच्या विजयाची मोठी उत्सुकता मतदारांना लागून राहिली. उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार२१७ मतांनी पराभव केला.
यावेळी उदयनराजे जलमंदिर निवासस्थानीच होते. आपला पराभव दिसू लागल्याने ते घरीच बसून होते. कार्यकर्ते उदयनराजे कडे गेले व त्यांना विजयी होत असल्याचे सांगितले. उदयनराजे भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत दमयंतराजे भोसले होत्या. यानंतर साताऱ्यात जल्लोषी वातावरण झाले. सातारा शहरातून उदयनराजेंची मोठी मिरवणूक काढण्यात आली. संख्येने तरुणाई सामील झाली होती राजवाडा येथून त्यांची विजयी मिरवणूक राजपथावरून निघाली. यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. सातारा शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. मिरवणूक फटाके फोडत, गुलालाची उधळण करत जात होती. सातारकरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उदयनराजेंचे अभिनंदन केले. मतमोजणीच्या वेळी आणि सुरुवातीला शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येताच आणि नंतर उदयनराजे आघाडी घेताना शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साताऱ्यात मतदारांनी यावेळी वेगळा मतमोजणीचा अनुभव घेतला.
आणखी वाचा-रायगडचा गड सुनील तटकरेंनी राखला…
सातारा लोकसभा मतदारसंघ विधानसभा निहाय आघाडी
सातारा जावळी- भाजप
उदयनराजे (१,१६,९३८ शशिकांत शिंदे (८०,७०५)
कोरेगाव -भाजप
उदयनराजे (१,०३,९२२) शशिकांत शिंदे (९७,०८७)
वाई खंडाळा महाबळेश्वर – राष्ट्रवादी
उदयनराजे (९०,६८५) शशिकांत शिंदे (९७,४२८)
कराड उत्तर – राष्ट्रवादी
उदयनराजे (८८,९३०( शशिकांत शिंदे (९०,६५४ )
कराड दक्षिण – भाजपा</strong>
उदयनराजे (९२,८१४) शशिकांत शिंदे (९२,१९८)
पाटण – राष्ट्रवादी
उदयनराजे (७५,४६०) शशिकांत शिंदे (७८,४०३)
एकूण मते
उदयनराजे (५,६८,७४९)
शशिकांत शिंदे (५,३६,४७५)
उदयनराजे विजयी (३२,७७१)