वाई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्या बद्दल आक्रमक झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाईची मागणी केली आहे. खासदार उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे की, छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्याची स्थापना केली. तंजावरपासून अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर महाराजांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत. गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे, हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या आस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे.
सातारा: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्त्यव्याबद्दल उदयनराजेंची मोदी शहांकडे तक्रार
खासदार उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे की, छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-11-2022 at 23:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje complaint modi shah controversial speech governor bhagat singh koshyari and sudhanshu trivedi ysh