राज्यात मुघल बादशाह औरंगजेबावरून राजकारण तापलं आहे. औरंगजेबाच्या पोस्टरवरून राज्यात अनेक ठिकाणी राडे आणि दंगली उसळल्या. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “औरंगाजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगाजेबाचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी देखील सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीनंतर वंचितचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सर्व विरोधक यावरून उद्धव ठाकरेंवर टीका करू लागले आहेत. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांवर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. परंतु ते म्हणाले, जेव्हा आमची युती (शिवसेना-भाजपा) होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी साहेब (भाजपाचे ज्येष्ठ नेते) जिन्नाहच्या (मोहम्मद अली जिन्नाह) कबरीवर गेले होते. तसेच नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले पंतप्रधान केक खायला गेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. मला असं वाटतं, लोकांना आता इतिहासात अडकवून ठेवण्यााऐवजी नव्या विचारांसह पुढं जावं.

हे ही वाचा >> “१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा, भ्रष्टाचाराचा जाब…” उद्धव ठाकरेंची घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येक वेळेला निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर मग तिकडे जय बजरंग बली करायचं, कधी दाऊदचा चेहरा, तर कधी औरंगजेबाचा चेहरा वापरायचा, असं सगळं सुरू आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे हे ‘औरदंगाबाद’ आहेत, मी त्यांना ‘औरदंगाबाद’ म्हणतो. कारण यांना केवळ दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray aaks bjp why lal krishna advani bow head on muhammad ali jinnah grave asc